Meaning : शौच, मूत्रविसर्जन इत्यादी क्रियेची इच्छा होणे.
Example :
त्याला जोरात लागली.
Translation in other languages :
Meaning : अंगवळणी पडणे.
Example :
त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
Synonyms : जडणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या ठिकाणी येऊन थांबणे.
Example :
नाव किनार्याला लागली.
गाडी फलाटाला लागली आहे.
Translation in other languages :
Meaning : ढोल, वीणा इत्यादींची दोरी, तार, चामडे इत्यादी ताणले जाणे.
Example :
शेकोटीची ऊब दिली की डफ चांगला चढतो.
तंबोरा चांगला लागला आहे.
Synonyms : चढणे
Translation in other languages :
Meaning : वर्ष, महिना इत्यादींचा आरंभ होणे.
Example :
गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष लागते.
Synonyms : श्रीगणेशा होणे, सुरवात होणे, सुरू होणे
Meaning : एखाद्या वस्तूचा दुसर्या एखाद्या वस्तूला स्पर्श होणे.
Example :
चालता चालता माझा हात विजेच्या खांब्याला लागला.
Synonyms : स्पर्श होणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूची आवश्यकता असणे.
Example :
आम्हाला काही नवीन वस्तूंची गरज आहे.
ह्या कामाला दोनशे कामगार लागतील.
Synonyms : आवश्यकता असणे, गरज असणे, जरूरी असणे
Translation in other languages :
* किसी की आवश्यकता या ज़रूरत होना।
हमें कुछ नई वस्तुओं की आवश्यकता है।Meaning : भाग पडणे.
Example :
पुस्तक हरवल्यास दंड भरावा लागतो
Translation in other languages :
Meaning : पार पाडण्यासाठी सोपवणे.
Example :
तुला त्यांना भेटवण्याचे काम माझ्याकडे लागले
Meaning : शरीराचे अंग एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येणे.
Example :
आंघोळ केल्याशिवाय मूर्तीला शिवू नकोस.
Synonyms : तटणे, शिवणे, स्पर्श करणे
Translation in other languages :
किसी वस्तु से अपना कोई अंग सटाना या लगाना।
श्याम प्रतिदिन अपने माता-पिता के चरण छूता है।Make physical contact with, come in contact with.
Touch the stone for good luck.Meaning : जाणीव होणे.
Example :
मला कडाडून भूक लागली
Meaning : प्रारंभ होऊन सुरू असणे.
Example :
पाडव्याला नवे वर्ष लागते.
Meaning : प्राप्त होणे, मिळणे.
Example :
खणताना आठ फुटावर पाणी लागले.
Translation in other languages :
Meaning : नाते वा संबंध असणे.
Example :
ती तुझी कोण लागते?
Translation in other languages :
Meaning : कुजण्यास, सडण्यास आरंभ होणे.
Example :
पेटीतला एक आंबा लागला की सगळेच लागतात
Synonyms : डागाळणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीचा वाईट परिणाम होणे.
Example :
भर दुपारी वणवण केल्याने त्याला ऊन लागले
Synonyms : बाधणे
Meaning : पूर्णपणे आणि योग्य रीतीने मिसळले जाणे.
Example :
चिवड्यात मीठ व्यवस्थित लागले
Meaning : योग्य त्या सप्तकात ध्वनी निर्माण करायला तयार होणे.
Example :
तंबोरा कसा छान लागला
Synonyms : जुळणे
Meaning : मुख्य विधी, संस्कार होणे.
Example :
बारा वाजता लग्न लागले
Meaning : मग्न, गुंतलेला असणे.
Example :
वातावरण शांत असले की अभ्यासात मन लागते
Meaning : एखादे वाहन किंवा व्यक्तीचे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचण्यासाठी वेळ खर्च होणे.
Example :
मला घरी पोहचायला एक तास लागेल.
Translation in other languages :
किसी वाहन या व्यक्ति के एक स्थान से दूसरे तक पहुँचने के लिए समय का व्यतीत होना।
मुझे घर पहुँचने में एक घंटा लगेगा।