अमर्याद (विशेषण)
सीमांनी बांधला न गेलेला.
बाजरी (नाम)
एक खाद्य धान्य.
अनावर (क्रियाविशेषण)
ज्याला आवर घालता येत नाही अशा रितीने.
गोसावी (नाम)
संन्यास आश्रम स्वीकारलेली व्यक्ती.
चांदवा (नाम)
एक प्रकारचा मासा.
शेकोटी (नाम)
थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून केलेला गवत,वाळक्या काटक्या,पाने इत्यादींचा विस्तव.
ब्रह्मचारी (नाम)
स्त्रीसंगपरित्यागाचे व्रत आजन्म किंवा काही काळपर्यंत पाळणारा मनुष्य.
नगारा (नाम)
लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
डंका (नाम)
लोखंडी पसरट तोंडाच्या व निमुळत्या बुडाच्या भांड्याचे तोंड चामड्याने मढवून तयार केलेले चर्मवाद्य.
गोंद (नाम)
बाभळ, खैर, शेवगा इत्यादी झाडांपासून निघणारा चिकट पदार्थ.